राज्य

ग्राहकांनो सावधान! व्हॉटस्अ‍ॅपवर मोठ्या फर्मची बनावट लिंक पाठवून सायबर गुन्हेगार करतायेत फसवणूक..


पुणे – तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सायबर गुन्हेगार इंटरनेटवर वेगवेगळ्या पध्दती वापरुन नागरिकांची फसवणूक करत आहेत. यात सध्या सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅपवर डी मार्टची बनावट लिंक पाठवत असून त्याद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अशी बनावट लिंक उघडू करु नये, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक फिरत आहे. सदर लिंक ही डी मार्टची असल्याचे भासवून त्यांच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्याचा दावा करणारी ती बनावट लिंक सतत पुढे पाठविली जात आहे. सदर बनावट लिंकवर क्लिक केल्यास, एक वेबपेज उघडते त्यात मात केली आहे. डी मार्टच्या बनावट लिंकद्वारे फसवणूक? पुणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन चार प्रश्‍न विचारले जातात जसे की, तुम्ही डी मार्टला ओळखता का? तुम्ही कोणत्या वयोगटात बसता? तुम्हाला डी मार्ट कसे वाटते? अशा प्रकारचे प्रश्‍न विचारले जातात. किंवा एक ‘स्पिन व्हील’ दिले जाते. ते फिरवल्यास एक पॉपअप येतो, त्यात तुम्ही पाच हजार रुपयांपर्यंतचे गिफ्ट कार्ड तसेच काही वस्तू जिंकला आहात असे भासवून सदर स्पर्धा इतर मित्रांसह व्हॉट्सअ‍ॅपवर 5 गु्रप किंवा 20 मित्रांसोबत शेअर करा असे सांगितले जाते. स्क्रीनवरील ब्लू बार पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्याने शेअर करत राहणे आवश्यक आहे असे सांगून आपणाकडून आपल्या बँकेविषयी गोपनीय माहिती विचारू शकतात, ज्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते.
याबाबत नागरिकांना पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की, यासारख्या फसव्या लिंक ओपन करु नये, आपला ओटीपी शेअर करु नये, अनोळखी अ‍ॅप डाउनलोड करु नये, अनोळखी फोन कॉलवर स्वत:ची कोणतीही माहिती देऊ नये. तसेच कोणतीही बँक खात्याशी संबंधित माहिती जसे की, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी आदी माहिती मागत असल्यास ही गोपनीय माहिती कोणासही देऊ नये. तसेच समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोणतेही अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करु नये, तसेच स्वत:च्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरच्या खात्याचा पासवर्ड, स्वत:चा मोबाइल क्रमांक न ठेवता तो अंक, अक्षरे, चिन्ह असलेल्या स्वरुपात ठेवावा.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close