Vपंढरपूर – निरा खोऱ्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे अद्यापही वीर धरणामधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. सोमवारी सकाळी 5737 क्युसेकने पाणी निरा नदीच्या पात्रामध्ये सोडले जात होते. दरम्यान तेथील चारही धरणांमध्ये सरासरी 99.55% पाणीसाठा झाला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निरा खोऱ्यात सातत्याने पाऊस होत असून वरील धरणे भरल्यामुळे वीर मध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने आतापर्यंत निरा नदीत अनेकदा पाणी सोडावे लागले आहे. सध्या पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे वीर प्रकल्प 100% भरला आहे. यामुळे या प्रकल्पातून सांडव्यावाटे 4,637 तर एस्केप मधून अकराशे क्यूसेकने पाणी सोडले जात आहे.
निरा देवघर प्रकल्प 100% भरला आहे. तर भाटघर धरणामध्ये शंभर टक्के गुंजवणीत 94% पाणीसाठा झाला आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणात मिळून 48.11 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त पातळीत आहे.
Back to top button