राज्य

कोयना परिसरात पावसाचा जोर कायम, धरणं भरू लागली


कराड – कोयना धरणासह सातारा, कोल्हापूर व सांगली भागातील धरणांवर चांगला पाऊस बरसत असून तेथील धरणं भरू लागली आहेत. कोयनेत 41.36 टक्के जलसाठा झाला आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण होते. जलविद्युत निर्मितीची भिस्त असणाऱ्या कोयना धरणाने तळ गाठला होता. मागील दोन आठवड्यांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर कोयना व परिसरातील धरणांवर चांगला पाऊस होत असल्याने तेथील धरणं आता भरू लागली आहे. मागील चोवीस तासात कोयना धरणावर 158 मि.मी. (एकूण  1915), धोम 9 (310), कण्हेर 19 (257), वारणा 96 (796), दूधगंगा 108 (1180), राधानगरी 211 (1920), तुळशी 180 (1362), कासारी 196 (2023), पाटगाव 328 (3443), धोम बलकवडी 60 (1114), उरमोडी 19 (357), येरळवाडी 2 (59), तराळी 50 मि.मी.(615 मि.मी.)
सध्या कोयना धरण 41.36 टक्के भरले आहेत. तर अन्य धरणातील पाणीसाठा टक्केवारीत पुढीलप्रमाणे ः धोम 43.69, कण्हेर 38, वारणा 61.61, दूधगंगा 38.71, राधानगरी 79.63, तुळशी 37.74, कासारी 76, पाटगांव 61.90, धोम बलकवडी 83.85, उरमोडी 43.46, येरळवाडी 0.36 तर तारळी 74.58 टक्के.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close