राजकिय

पवारांसाठी राऊतांची कधी “मुंबई” तर कधी “नवी दिल्लीच्या” पिचवर तुफान बॅटिंग सुरूच


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान उभे करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशिवाय दुसरा कुणीही असू शकत नाही. मोदींशी लढण्यासाठी पवार हेच सक्षम पर्याय ठरू शकतात, असे भाकित  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान त्यांची पवार यांच्यासाठीची मुंबई क्षव नवी दिल्लीच्या पीचवर तुफान बॅटिंग महाविकास आघाडी सरकार आल्यापासून अद्यापही सुरूच आहे. यापूर्वी त्यांनी काहीवेळा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील देशाचे नेतृत्व करू शकतात अशी विधानं केली आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना करता खासदार राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे पवार यांच्याशी संबंध नेहमीच चांगले राहिले आहत. आता ही मातोश्री व सिल्व्हर ओक मधील दुवाच तेच असल्याचे दिसते. यामुळे मागील दीड वर्षात राऊत हे नेहमीच पवार यांची सतत स्तुती करताना दिसतात. त्यांनी पवार यांच्यासाठी काँगे्रसला ही अनेकदा सल्ले दिले आहेत. तर पवार यांच्यावरूनच भाजपाला खूप चिमटे काढले आहेत. ते कधी शरदरावांसाठी मुंबईच्या तर कधी नवी दिल्लीच्या पिचवर बॅटिंग करताना दिसतात. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता पंतप्रधान मोदी यांना पवार हेच पर्याय ठरू शकतात असा विधान करून नवी दिल्लीच्या राजकारणात आणखी एका नवी चर्चा घडवून आणली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विरोधक हे पंतप्रधान मोदी यांना पर्याय शोधत आहेत. यासाठी विविध बैठका तसेच चर्चा सुरू आहेत. 2014 मध्ये भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पुढे केले आणि जनतेनेे दोन वेळा या पक्षाला संपूर्ण बहुमत देवून सत्ता सोपविली आहे. मोदी यांची लोकप्रियता अफाट असून देशात अनेक राज्यात सत्तांतर त्यांनी घडविली आहेत. पश्‍चिम बंगालसारख्या राज्यात जेथे भाजपाचे केवळ तीन आमदार होते तेथे आता 75 जण निवडून आले आहेत. येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने जोरदार फिल्डींग लावली असून केंद्रीय मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार नुकताच केला आहे. यामुळे सहाजिकच विरोधक ही आता अलर्ट मोडवर असून त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे.
ज्या काँगे्रस पक्षाच्या भरोश्यावर इतके वर्षे विरोधकांची मोट होती ती आता फोल ठरत असून अनेक राज्यात काँगे्रस अत्यंत पिछाडीवर गेली आहे. प.बंगालमध्ये तर सपशेल पराभूत झाली आहे. अशा स्थितीत देशात जनतेसमोर सक्षम उमेदवार देण्याची कसरत विरोधक करत आहेत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांची दोन वेळा भेट घेतली. यानंतर नवी दिल्लीत काही विरोधी पक्षांसह विचारवंतांनी ही बैठक घेवून मंथन केले आहे. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सततच शरद पवार हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत अशी मागणी करत आहेत. तसेच त्यांनी यूपीएचे नेतृत्व देखील पवार यांच्याकडे द्यावे असा सल्लाही काँगे्रसला सामनाच्या अग्रलेखातून अनेकदा दिला आहे.  
देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सक्षम पर्याय ठरेल अशी आघाडी उभी राहावी, यासाठी हालचाली सुरू आहेत. यूपीएचे नेतृत्व करणार्‍या काँग्रेसची यात काय भूमिका असणार, हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत. किशोर यांनी पवार यांची  दोनवेळा भेट घेतली तर अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही ते भेटले. या स्थितीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आघाडीचा चेहरा कोण असणार, हा कळीचा प्रश्‍न असून त्याअनुषंगाने राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सक्षम पर्याय ठरेल अशी आघाडी उभी राहावी, यासाठी हालचाली सुरू आहेत. यूपीएचे नेतृत्व करणार्‍या काँग्रेसची यात काय भूमिका असणार, हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close