राजकिय

राष्ट्रवादीकडून विजयदादांविरोधात सुडाचे राजकारण !

अकलूज – राज्यकर्ते कसे नसावेत आणि जनाधार नसताना एखादं सरकार सत्तेत आलं तर ते किती खराब काम करु शकतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना राजकीय विरोध करुन सुड घेण्यासाठीच या तिघाडी सरकारमधील राष्ट्रवादी धडपडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायतीस परवानगी अडवून ठेवल्याविरोधात या तीन गावचे लोक गत 23 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. त्यांना भेटण्यासाठी गुरूवारी दरेकर अकलूज येथे आले होते. ते पुढे म्हणाले, येथील पालकमंत्री पालकमंत्री नसून बालकमंत्री आहेत. त्यांच्या अंगातील बालिशपणा अद्याप गेलेला नाही. म्हणून त्यांनी अजून उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली नाही. अधिवेशन पूर्ण दिवसांचे झाले असते तर आम्ही या सरकारला जाब विचारला असता. पण हे पळपुटे सरकार आहे. विरोधकांना घाबरुन यांनी अधिवेशन गुंडाळले. या सरकारमध्ये सत्तेचा मुकूट जरी शिवसेनेच्या डोक्यावर असला तरी सर्व अधिकार मात्र राष्ट्रवादीकडेच आहे. यांच्या नसा – नसात राजकारण भरले आहे, लवकरच हे सरकार पडेल, मग आम्ही यांचे हिशेब चुकते करु.
यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परीचारक, मदनसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 विजयदादांनी राज्याला भरभरुन दिले

विजयदादा जेव्हा ग्रामविकासमंत्री, उपमुख्यमंञी होते तेव्हा त्यांनी राज्यात प्रचंड विकास कामे केली. अगदी विरोधकांचीही कामे ते भेदभाव न ठेवता करत होते. आताचे सरकार मात्र नागरिकांना विसरून स्वतःच्याच विकासात गुंतले आहे.

आ. प्रशांत परिचारक

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close