राज्य

निरा खोर्‍यात 96.74 टक्के पाणीसाठा, वीर च्या पाण्याने निरा व भीमा दुथडी भरून वाहू लागल्या

पंढरपूर  – निरा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे वीर धरणातून 42 हजार क्युसेकने पाणी सोडले जात असल्याने निरा व भीमा नदी  दुथडी भरून वहात आहे. दरम्यान निरा खोर्‍यातील चार धरणांमध्ये 96.74 टक्के पाणीसाठा झाला असून तो गतवर्षीच्या तुलनेत 17 टक्के जास्त आहे.
निरा खोर्‍यातील गुंजवणी, देवघर, भाटघर व वीर ही धरण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून पावसाचा अद्यापही जोर असल्याने चारही धरणांचे दरवाजे उघडले आहेत. मागील तीन धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने वीर धरणाचा विसर्ग वाढून तो 42 हजार 983 क्युसेक करण्यात आल्याने निरा व भीमा नदीची पाणी पातळी आता वाढली आहे. दरम्यान शनिवारी सकाळपर्यंत निरा खोर्‍यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर होता.
निरा खोर्‍यातील चार धरणांमध्ये मिळून 46.75 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळपर्यंत एकाच दिवशी 2.59 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.  भाटघर  धरण 100 टक्के भरले असून यातून 15 हजार 661 क्युसेक, देवघर प्रकलप 94.86 टक्के  भरला असून यातून 4538 तर गुंजवणीत 88.33 टक्के जलसाठा असून यातून 2174 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. यामुळे वीर मधून बेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close