राजकिय

माढा विधानसभा : मीनलताई साठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्याचे सुशीलकुमार शिंदे यांचे आश्वासन

  • पंढरपूर – माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मीनलताई साठे यांनी मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले असता शिंदे यांनी आपण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.

आज सोलापूर येथे देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांची सदिच्छा भेट साठे यांनी घेतली. त्यांच्या समवेत माजी आमदार धनाजीराव साठे, दादासाहेब साठे उपस्थित होते.

माढा विधानसभा मतदारसंघात करत असलेल्या कामाचा कार्य अहवाल मीनलताई साठे यांनी सादर केला. सध्याची राजकीय परिस्थिती आणि घडामोडींवर यावेळी सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.
शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीची आवर्जून चौकशी केली आणि साठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. माढा विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा मीनलताई साठे यांनी व्यक्त केली, यावर शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून माढा विधानसभा जागेबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्यावतीने अनेक नेते माढा व करमाळा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. माढ्यामधून तेथील नगराध्यक्ष मीनलताई साठे यांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. विविध उपक्रम त्या माढा विधानसभा क्षेत्रामध्ये राबवत आहेत, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून येथून विधानसभा निवडणूक त्यांनी लढवावी, असाकार्यकर्ते व मतदार आग्रह देखील करत आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close