विशेष

Ujani update | Good news उजनी क्षमतेने भरले , पुढील पावसाळ्यापर्यंतची चिंता मिटली

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात अद्यापही दौंड जवळून पाण्याची आवक होत असून धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 4 हजार 350 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
उजनी धरण क्षमतेने म्हणजे 111.28% इतके भरले असून धरणात एकूण पाणीसाठा 123.28 टीएमसी इतका आहे. यातील उपयुक्त पाणी 59.62 टीएमसी आहे. उजनीवर आज पावसाची नोंद नाही या पावसाळा हंगामात धरणावर एकूण 583 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. परतीच्या पावसाने भीमा खोऱ्यात तसेच उजनी जलाशय परिसरात हजेरी लावल्याने उजनी मध्ये येणारी पाण्याची आवक ही 3940 क्युसेक इतकी आहे. यामुळे धरणातून वीज निर्मिती करता 1600 क्युसेक तर सांडव्यामधून 2750 असे एकूण 4350 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
ऑगस्ट महिन्यापासून सतत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 100 टीएमसी हून अधिक पाणी सोडले गेले आहे. धरण क्षमतेने भरले असल्याने आता पुढील पावसाळ्यापर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातून सध्या मुख्य कालव्यात एक हजार क्युसेकने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close