Uncategorizedराजकिय

कल्याणराव काळे यांच्या विधानपरिषदेसाठी आमदारांचे अजितदादांना साकडे

पंढरपूर – अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतीक सदस्य कल्याणराव काळे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार व जिल्हाध्यक्ष यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन देण्यासाठी तसेच याविषयी चर्चा करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे यशवंत माने या आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली व त्यांना काळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचे साकडे घातले.

गेल्या काही दिवसापासून सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे समर्थक विधानपरिषद आमदारकीसाठी महायुतीचे आमदारांना साकडे घालताना दिसत होते. पंढरपूर तालुका हा चार विधानसभा क्षेत्रात विभागला असून येथे चारही ठिकाणी आमदार महायुतीचे आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काळे गटाची गरज असल्याने या आमदारांनी काळे यांच्या आमदारकीची शिफारस महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे करावी, अशी मागणी समर्थकांची होती. यासाठी त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील, आ. बबनदादा शिंदे, आ. यशवंत माने तसेच पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती.

येत्या काही दिवसात 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होणार असून यासाठी कल्याणराव काळे यांना संधी मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे . या अंतर्गत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली आहे. यावेळी कल्याणराव काळे हे देखील उपस्थित होते. काळे यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तसेच माढा विधानसभा ही लढवली आहे. त्यांचा गट पंढरपूर तालुक्यात काम करत असून सांगोला व माढा मतदारसंघात त्यांचे प्राबल्य आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close