विशेष

“स्वेरी” त आज लॉ कॉलेजचे उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार

पंढरपूर – तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात स्वेरी महाविद्यालयात लॉ कॉलेज, नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेने सुसज्ज असलेल्या क्रीडांगणाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते रविवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी होणार आहे.


स्वेरी महाविद्यालयात लॉ कॉलेज ( विधी महाविद्यालय ) सुरुवात 2025 – 26 या शैक्षणिक वर्षापासून झाली आहे. मागील 27 वर्षापासून स्वेरी संस्थेच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालय कार्यरत आहेत. आता लॉ कॉलेजही या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजता चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते विधी महाविद्यालय, नवीन बहुउद्देशीय इमारत व क्रीडांगणाचे उद्घाटन होणार असून त्याचवेळी विद्यार्थिनींसाठी बांधल्या जात असलेल्या नऊ मजली नूतन वसतिगृह इमारतीचा पायाभरणी सोहळाही पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री जयकुमार गोरे हे भूषवणार असून या कार्यक्रमासाठी समाधान आवताडे, अभिजीत पाटील , राजू खरे , डॉ.बाबासाहेब देशमुख हे आमदार तसेच शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, राम सातपुते हे माजी आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे , असे आवाहन संस्थेचे संस्थापक डॉ. बीपी रोंगे, अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत व सचिव डॉ. सूरज रोंगे यांनी केले आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close