विशेष

मोलमजुरी करणाऱ्या महिलेकडून श्री विठ्ठल चरणी २० ग्रॅम सोनं अर्पण 

पंढरपूर – उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करणाऱ्या   शकुंतला एकनाथ वाघ (रा. मजरे ता. चाळीसगाव जि. जळगाव) यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर  समितीस एक लाख 41 हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू दान केली असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

 या दानशूर महिला भाविकाचा मंदिर समितीच्यावतीने  सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिमा व उपरणे देऊन  सन्मान करण्यात आला. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर,  ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.

           शकुंतला वाघ यांचे लग्न झाल्यानंतर काही कारणास्तव पतीने त्यांना विभक्त केल्याने त्या भाऊ तुकाराम एकनाथ वाघ यांच्याकडे राहायला गेल्या व उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी केली. मोलमजुरी करून त्यांनी  मजरे या गावी २ एकर जमीन खरेदी केली.  त्या जागी  २०१८ मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर  स्वखर्चाने उभारले व फाल्गुन शुद्ध २ या दिवशी मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण केले आहे. दरवर्षी या तिथीला पांडुरंगाचा वाढदिवस तेथे साजरा केला जातो. तसेच त्या दिवशी सात दिवसाच्या भागवत सप्ताह देखील केला जातो. त्यांनी मोलमजुरी करून आपल्या जमापुंजीतून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास २ तोळे (लगड) सोने दान करून आपली इच्छा पूर्ण केली आहे. सदर वस्तूची किंमत एक लाख 41 हजार  आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close