राजकिय

तयारी नगरपरिषदेच्या निवडणुकीचीः पंढरपूर शहराचा विश्‍वास मिळविलेल्या परिचारक गटाला विरोधक आव्हानं देवू शकतील?


पंढरपूर- नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांनी दिले असल्यामुळे आता या रणधुमाळीच बिगुल वाजले आहे. यामुळे पंढरपूरमध्ये सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी देखील कंबर कसली असून आमदार प्रशांत परिचारक पुन्हा पालिकेवर वर्चस्व राखणार का? कि स्व.भारत भालके यांच्या पश्‍चात पालिकेवर विरोधकांचा झेंडा फडकणार? यंदा तिसरी आघाडी निर्माण होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यात सत्तेवर असणारा  राष्ट्रवादी काँगे्रस हा पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला असून गटबाजी असली तरी सतत बैठका होत आहेत. पक्षात नुकतेच आलेले कल्याणराव काळे हे सर्वच बैठकांना हजेरी लावत आहेत. या पक्षाची ताकद वाढत असली तरी येथे अनेक गटतट असल्याने यात समन्वय राखताना वरिष्ठांची दमछाक होत आहे. भगीरथ भालके, कल्याणराव काळे, युवराज पाटील, दीपक पवार, अ‍ॅड. गणेश पाटील यांच्यासह सर्व शहर व तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी मनावर घेतले तर नगरपरिषदेला चांगले आव्हानं देवू शकतात.
पंढरपूर नगरपरिषदेची पंचवार्षिक मुदत 30 डिसेंबर मध्ये पूर्ण होत आहे. मात्र कोरोनाची स्थिती पाहता सदर निवडणूक पुढे जाते काय अशी शक्यता व्यक्त केली जात असताना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सर्वच पालिकेच्या प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. यामुळे पंढरपूर शहराचे राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे. पालिकेवर जवळपास पंचवीस वर्षापासून परिचारक आघाडीची निर्विवाद सत्ता आहे. केवळ अडीच वर्षासाठी नगरपालिकेचा कारभार विरोधकांच्या हाती होता. यामुळे पुन्हा एकदा सत्तेचा हा सोपान सर करण्यासाठी विरोधकांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
शहराच्या राजकारणावर परिचारक यांनी अनेक वर्षापासून आपले वर्चस्व राखले आहे. स्व.भारत भालके यांनी तीनवेळा विधानसभा विजय मिळवला असला तरी यापैकी केवळ अडीच वर्षेच त्यांना नगरपालिकेची सत्ता मिळवता आली होती. मात्र परिचारक यांच्या शहर विकास आघाडीने शहरातील मतदारांचा सातत्याने विश्‍वास जिंकला आहे. यामुळे विरोधकांना विधानसभेपेक्षा नगरपालिकेची निवडणूक तुलनेने अवघड जाती.
नगरपालिकेमध्ये 1991 साली परिचारक व कै. औदुंबरआण्णा पाटील यांनी युती करून विजय मिळवला होता. 1996 ला परिचारक यांनी एकहाती विजय मिळवला. 2011 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 18 विरूध्द 15 अशा केवळ दोन मताने परिचारक यांची सत्ता निसटली होती. मात्र अडीच वर्षानंतर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान विरोधी गटाच्या तीन नगरसेवकांनी परिचारक आघाडीला मतदान केल्याने पुन्हा परिचारक आघाडी सत्तेत आली. तर 2016 साली झालेल्या निवडणुकीत देखील 33 पैकी 25 जागा जिंकून परिचारक आघाडीने सत्ता राखली. यामुळे शहरातील मतदार सत्ताधारी शहर विकास आघाडीवर अधिक विश्‍वास टाकतात असे आकडेवारीवरून दिसते.
नव्वदच्या दशकात शहरात तिसरी आघाडी सक्रिय होती. परंतु मागील पाच निवडणुका पाहिल्या असता मतदारांपुढे तिसरा पर्यायच नाही. परंतु यंदा तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. याचा फायदा सत्ताधारी गटास होणार की विरोधकांना होणार हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होणार आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यांनी यापूर्वीच नगरपरिषद निवडणुकीत ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहेत.
या निवडणुकीत आता प्रशांत परिचारक व समाधान आवताडे हे दोन भाजपाचे आमदार एकत्र असल्याने येथे त्यांना आव्हानं देणे विरोधकांसाठी अवघड असले तरी अशक्य नाही. यासाठी त्यांनी आपल्यातील मतभेद बाजूला सारून निवडणुकीची तयारी क

Header

Related Articles

Back to top button
Close
Close