राज्य

विठ्ठल मंदिरात राज्यातील पहिल्या व्हीआर दर्शन सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन, देवाची विविध रूप पाहता येणार

पंढरपूर – विठ्ठलाची महापूजा आणि विविध रुप सर्वसामान्य भाविकांना अल्प दरात पाहता यावीत ,ज्ञयासाठी आज विठ्ठल मंदिरात व्ही आर गॉगल द्वारे पूजा पाहण्याची सेवा व्हर्चुअल वर्ल्ड व मंदिरे समितीच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शहस्ते करण्यात आला. यावेळी या दोघांनीही विहार गॉगलच्या माध्यमातून देवाची विविध रूप पाहण्याचा आनंद घेतला.

यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समिती सदस्य माधवीताई निगडे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी राजे शिंदे, शकुंतला नडगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी देवाचे थ्री सिक्सटी डिग्री मधील आभासी दर्शन व्यवस्था देशातील उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या नामवंत मंदिरात सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही सुविधा सुरू करण्याचा मान विठ्ठल मंदिराने मिळविला असून मंदिर समिती आणि व्हर्च्युअल वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा आता मंदिर समितीचे भक्तनिवास व शहरात इतर ठिकाणी देशभरातील भाविकांना पाहता येणार आहे.
विठुरायाच्या महापूजा करण्याची इच्छा हजारो भाविकांना असते मात्र अत्यंत मर्यादित पूजा संख्या असल्याने दरवर्षी या भाविकांना नाराज व्हावे लागते आता या व्ही आर दर्शन माध्यमातून डोळ्यावर व्ही आर गॉगल घातलेल्या प्रत्येक भाविकाला अगदी गाभाऱ्यात उभारून पूजा पाहण्याचा आभासी अनुभव घेता येणार आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ केला असून आता भाविकांसाठी हे दर्शन अत्यल्प दरात खुले झाले आहे. यासाठी या दर्शनाचा अनुभव घेणाऱ्या भाविकाला प्रत्येकी दोनशे रुपयांमध्ये ही विठुरायाची महापूजा आभासी पद्धतीने पाहता येणार आहे. हजारो भाविकांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी प्रयत्न करूनही पूजेचा नंबर लागत नसेल आता या योजनेमुळे भाविकांना पूजेसाठी नंबर नाही लागला तरी हा आनंद घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close