कर्नाटक राज्यातील बेळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पून:उभारणी करा अन्यथा आंदोलन करू:महाविकास आघाडी बोदवड
कर्नाटक राज्यातील बेळगाव मधील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची केल्याबद्दल कर्नाटक राज्यातील भाजप सरकारचा निषेध करत महाविकासआघाडी बोदवड तर्फे बोदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवमानकारक पद्धतीने गेल्याने तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याने कर्नाटक राज्यातील शिवराया विरोधी भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आली तसेच सदरील पुतळा पुनर्स्थापित न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे बोदवड शिवसेनेने दिले, त्यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख गजानन घोडके, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उपप्रमुख कलीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉक्टर उद्धव पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष ईश्वर जंगले, आनंद पाटील, नगरसेवक सुनील बोरसे, विजय पालवे, नगरसेवक सुधीर पाटील, शांताराम कोळी, संजू महाजन, हर्षल बडगुजर, सागर पाटील, नवीन खान, समीर शेख, विकी शर्मा, दीपक माली, अमोल व्यवहारे, विलास माळी, रामधन माळी, भास्कर गुरूचंल, गोपाल पाटील, पंकज वाघ, आयुब कुरेशी, प्रवीण लबडे, विनोद मायकर, धनराज सुतार, अनिल पाटील, आसिफ बागवान इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.