Uncategorizedविशेष

विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे गुरुवारी काम बंद आंदोलन

 

पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी  अनंता रोपळकर हे 3 जुलै 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना मनसे तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील यांनी   शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ मंदिर समितीचे कर्मचारी गुरुवारी  4 जुलै  सकाळी 10 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करणार आहेत.
मंदिर समितीचे सर्व कर्मचारी या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावले आहेत. समितीचे कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य सेवाभावी वृर्तीने व जबाबदारीने पार पाडत आहे. तथापि, अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे.
वरील सर्व बाबी विचारात घेता, संबंधित व्यक्तींना पांडुरंग चांगली सद्बुद्धी देवो व अशा गैरवर्तन करणाऱ्या इसमावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उद्या सकाळी दहा पासून श्री चे नित्योपचार वगळता इतर कामकाज बंद ठेऊन आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.
Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close