पुणे – भीमा व निरा खोऱ्यामध्ये पावसाचा जोर कायम असून मागील 24 तासात अनेक धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेला आहे.
बुधवार 3 जुलै सकाळपर्यंत मुळशी धरणावर 98 मिलिमीटर, टेमघर 95 ,वरसगाव 55, वडिवळे 28, आंध्रा 11 , पावना 21, कासारसाई 16, कलमोडी 20 याचबरोबर घोड उपखोऱ्यातील डिंभे 22, वडज 11 मिलिमीटर , अशा पावसाची नोंद आहे.
तर निरा खोऱ्यातील गुंजवणी धरणावर 53, नीरा देवघर 30, भाटगर 37, वीर 4 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. उजनी जलाशयावर बुधवारी सकाळपर्यंत सहा मिलिमीटर पाऊस झाला होता.
याचबरोबर कृष्णा खोऱ्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील धरणांवरही चांगला पाऊस झाला असून यात कोयना 133 मिलिमीटर ,वारणा 105, दूधगंगा 129 ,राधानगरी 85, तुळशी 202, कासारी 76, पाटगाव 95 ,धोमबलकवडी 26, उरमोडी 108 मिलीमीटर अशा पावसाची नोंद आहे.
Back to top button