सामाजिक

करकंब व मोडनिंब नगरपंचायतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी

पंढरपूर – माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील करकंब व माढा तालुक्यातील मोडनिंबच्या नगरपंचायतीच्या मागणीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीने निर्णय व्हावा, यासाठी आमदार अभिजीत पाटील पाठपुरावा सुरू केला असून यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

करकंब व मोडनिंबच्या नागरिकांची ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. या विलंबामुळं अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना, करकंब नगरपंचायतीबाबतची आवश्यक कार्यवाही पूर्ण करून ३ महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत.

न्यायालयाच्या या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, करकंब ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीत रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्राथमिक अधिसूचना तातडीने मंजूर करून प्रसिद्ध करावी, तसेच पुढील सर्व वैधानिक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
करकंब व मोडनिंब परिसरातील नागरिकांचं हे दीर्घकाळचं स्वप्न आणि उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश लक्षात घेता, या प्रकरणी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे त्यांनी सांगितले. करकंब-मोडनिंबच्या विकासाला गती देणारा हा निर्णय लवकरात लवकर व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरूच राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close