सामाजिक

यंदाचे हिवाळी अधिवेशन फायद्याचे, पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघासाठी ४५० कोटी रु. तरतूद 

 

पंढरपूर – यंदाचे नागपूर हिवाळी अधिवेशन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी चांगलेच फायदेशीर ठरले असून जवळपास साडेचारशे कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.

या हिवाळी अधिवेशनात आमदार समाधान आवाडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून यात पंढरपूर नगरपालिकेच्या मालमत्ता करवाढीचा समावेश होता. पंढरपूर चे सत्ताधारी व विरोधक सारेच करवाढी विरोधात आक्रमक आहेत. दरम्यान या अधिवेशन काळात आवताडे यांनी रस्ते, पाणी, मंदिर यासह विविध कामांसाठी निधी मंजूर करून घेतला आहे.

शासकीय व प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली होण्यासाठी गेली अनेक वर्षे निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या व पंढरपूर शहरांमध्ये साकार होणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ३२ कोटी, शहरातील विविध रस्ते विकास प्रकल्पसाठी १०४ कोटी त्याचबरोबर पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी १०८ कोटी व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती विकास आराखड्यासाठी १५० कोटी यासह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते व पुलासाठी ५७ कोटी असा निधी मंजूर करून घेतला आहे.

हा निधी मंजूर झाल्याने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव व नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या हस्ते आमदार समाधान आवताडे यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला आहे. आमदार समाधान आवताडे यांनी  हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने हा भरघोस निधी खेचून आणला आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा २०२१ च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे जिंकला असून आ. आवताडे यांच्या विजयाने येथे प्रथमच कमळ फुलले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठीही हा विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी महत्वाचा आहे. यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे. येणारी लोकसभा व नंतरची विधानसभा निवडणूक पाहता पंढरपूर मतदारसंघासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

आ.आवताडे यांनी या अधिवेशनात अनेक विषयांवर आवाज उठवला आहे. भीमा नदीवरील तामदर्डी बंधाऱ्यासाठी आग्रही भूमिका घेतली. ३५ कोटी रुपये यासाठी लागणार आहेत. 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close