विशेष

कष्टाच्या भाकरीसाठी !… या देशाचे माजी कॅबिनेट मंत्री पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम करतात तेंव्हा..

कोणतेही काम लहान नाही आणि कोणतेही मोठे नाही..कर्म हे कर्म असते आणि ते करावेच लागते. प्रामाणिकपणाने तुम्ही जे कष्ट करता त्याचे फळ नेहमीच चांगले आणि सुखी झोप देणारे असते. हे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या जगात सर्वात चर्चेचा देश असणार्‍या अफगाणिस्तानचे माजी माहिती व तंत्रज्ञान कॅबिनेट मंत्री असणारे सईद अहमद शाह सादात हे जर्मनी या देशात एका पिझ्झा बनविणार्‍या कंपनीत डिलिव्हरी बॉय प्रमाणे काम करत आहेत.
आपणाकडे एखादा साधा नगरसेवक झाला जरी झाला तर त्याची संपत्ती किती होते याची लाखो उदाहरण आहेत. आमदार, खासदार व मंत्री झाल्यानंतर अनेकांचे जीवन बदलून जाते आणि संपत्तीचे आकडेही. मात्र अफगाणिस्तानचे माजी कॅबिनेट मंत्री राहिलेल्या व दोन वर्षे हे पद उपभोगलेल्या सईद अहमदन शाह सादात यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी जर्मनी या देशात पिझ्झा पुरविण्याचे काम करावे लागत आहेत व त्यांनी या कामातही प्रामाणिकपणे झोकून दिले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातून कम्युनिकेशनच्या दोन पदव्या मिळविलेल्या सादात यांनी 2018 मध्ये आपल्या अफगाण देशाच्या विकासासाठी  राष्ट्रपती अशरफ गनी सरकारमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मंत्रिपद स्वीकारले होते. मात्र 2020 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि जर्मनी या देशात जाणे पसंत केले. येथे त्यांनी उदरनिर्वाहासाठी आपल्या शिक्षणायोग्य म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन कंपन्यात प्रयत्न केले. मात्र त्यांना संधी न मिळाल्याने त्यांनी अखेर एका कंपनीचे पिझ्झा घरपोहोच करण्याची नोकरी पत्करली आहे. यास अनेक देशात पिझ्झा बॉय म्हणून ओळखले जाते.
सादात यांनी कष्टाला किंमत दिली असून ते प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत. जर्मनीत त्यांच्याबाबत काही पत्रकारांना माहिती मिळाल्यानंतर त्यांची ही माहिती जगासमोर आली. सध्या अफगाणिस्तानकडे जगाचे लक्ष लागले असून यावर तालिबानने नुकताच कब्जा केला आहे. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close