कॅरिडॉरप्रश्नी आम्ही पंढरपूरच्या नागरिकांसमवेत आहोत, प्रशांत परिचारक यांची ग्वाही
पंढरपूर – कॅरिडॉर प्रकरणी पंढरपूरमध्ये विशेषतः मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी, येथील व्यापारी व नागरिकांना आम्ही आपल्या सोबत असून लोकांना त्रास होईल ,असा कोणताही निर्णय शासन दरबारी घेतला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
परिचारक म्हणाले, मुळात कॅरिडॉर हा शब्द कोठून आला हेच समजत नाही. कोणीतरी अधिकारी असे म्हणाले असतील. राज्याच्या प्रमुखांची इच्छा आहे की, पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून कोविड नंतर येथे येणार्या भाविकांची संख्या खूप वाढली आहे. येथील गर्दी पाहता सुयोग्य नियोजन करण्याची गरज आहे हे लक्षात घेवून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तीनही एजन्सीची एकत्रित बैठक घेतली आहे. यास आमदार, खासदार तसेच आपण उपस्थित नव्हतो. केवळ या एजन्सीजकडून प्रेझेंटेशन घेतले आहे. अद्याप कोणताही निर्णय नाही.
आपण काही महाराज मंडळी, या परिसरातील नागरिक, नगरसेवक यांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आयोजित केली होती. त्यावेळेसही फडणवीस यांनीही कोणालाही विस्थापित केले जाणार नाही,अशी ग्वाही दिली होती, असे परिचार भ क यांनी सांगितले.
मागील चार पाच दिवसांपासून पंढरपूरच्या मंदिर पसिरात कॅरिडॉर प्रश्नावरून आंदोलन सुरू झाली असून कालच येथील नागरिकांनी आत्मक्लेश आंदोलन केले आहे. तसेच विरोध दर्शविण्यासाठी व्यापार्यांनी दुकानांवर फलक ही लावले आहेत.