तंत्रज्ञान

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये स्वेरीच्या 462 विद्यार्थ्यांची आजवर निवड, यंदा 68 जणांना मिळाली संधी

पंढरपूर – येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूूमधून 68 विद्यार्थ्यांची निवड झाली असून आत्तापर्यंत टी.सी.एस. मध्ये स्वेरीच्या एकूण 462 विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
स्वेरी महाविद्यालय आपला रौप्यमहोत्सव साजरा करत असून 1998 ला सुरू झालेले हे महाविद्यालय नवनवीन विक्रम करत आले आहे. येथील शिस्त, ज्ञान, संशोधनाला दिले जाणारे प्रोत्साहन, प्रगतिपथावर नेणारे उपक्रम, विविध विषयांवरील राज्य, देश यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील होणारे सेमिनार यामुळे विद्यार्थी घडविणारे महाविद्यालय म्हणून स्वेरीकडे पाहिले जाते. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी सहज नोकर्‍या मिळवित आहेत. याचबरोबर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेकजण प्रशासनात ही नियुक्त झाले आहेत.
’टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या बहुराष्ट्रीय व  नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून तब्बल 68 विद्यार्थ्यांची निवड केली. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून काव्यांजली चंद्रकांत मंगरुळे, अभिषेक महेश आराध्ये, शिवानी राजेश आवताडे, रसिका विष्णू गिरवीकर, क्षितिजा मिलिंद फासे, मधुरा मिलिंद बडवे, जयदीप प्रदिप जाधव, प्रतिक सुभाष देशपांडे, सौरभ राजेश वाघुले,  गौरी प्रमोद कुलकर्णी,  ऐश्‍वर्या दत्तात्रय तोडकरी, दीक्षा दिगंबर लाळे, रसिका अखिलेश वेळापुरे, प्रिया प्रशांत कचरे, प्रशांत जगन्नाथ जलगिरे, चेतन रमेश क्षीरसागर,  सिद्धी बालाजी शितोळे, गौरव राजेंद्र वाघमारे, स्नेहल सुरेश पुजारी, काजल बापू खराडे, पूजा मोहन दांडगे, प्रणेश प्रकाश सुतार, फिझा सैफन शेख, सलोनी आगतराव गावडे, वैष्णवी ज्ञानेश्‍वर जगनाडे, सोनिया शरद कागदे, गीतेश्‍वरी अनिल शिंदे, आदित्य दत्तात्रय धायफुले, विविता कृष्णदेव ढेकळे, सानिका रमेश व्यवहारे, विश्‍वजीत उदय राजोपाध्ये, विवेक महेश निकते, ऋत्विज कांतीलाल बुबणे, ओंकार संजय पवार,नवीन अमोल मदुर, योगेश भास्कर डोंगरे, क्षिप्रा विद्याधर कुरणावळ, अबोली संजय अडसूळ, प्रतिक अनिल वाळूजकर, वैष्णवी अशोक गोटे, प्राजक्ता दत्तात्रय कुलकर्णी, केतकी भास्कर देशपांडे, प्रसन्न मन्मथ लुंगरे, निकिता संभाजी भोसले, गिरीधर गुणपाल शेट्टीगर, वैष्णवी झुंबर सुरवसे, जयेश संतोष खड्डे, ऋषिकेश पितांबर देशमुख, ओंकार मुकुंद लाड, ईश्‍वरी गोविंद शेळके, धनराज संजय भोसले, सौरभ दत्तात्रय मुळे, श्रध्दा अर्जुन अंबुळे,आकाश प्रसाद अजगर, प्रथमेश रमेश किरगत, निलेश संजय कदम, सचिन अशोक क्षीरसागर, वैभव नानासाहेब गायकवाड, ओंकार संजय पाटील, युवराज विनोद शेलार, दिपक पांडुरंग शिंदे, दीपज्योती दत्तात्रय साठे, सूरज दत्तात्रय मोरे, गणेश शंकर तोडकर, सौरभ बंडू कडसरे, अथर्व संतोष जोशी, सुनील अंबादास सादुल व योगेश सम्रुत आवताडे अशा मिळून स्वेरीच्या एकूण 68 विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना वार्षिक 3.36 लाख रुपये पॅकेज मिळाले आहे. या कंपनीत गतवर्षी पर्यंत स्वेरीच्या 394 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली होती. त्यात आता या नवीन 68 विद्यार्थ्यांची भर पडली असून टी.सी.एस. कंपनीत आतापर्यंत विक्रमी 462 जणांची निवड झाली आहे.
स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले  ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिल’चे 4 पैकी 3.46 सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व 4 पैकी 3.46 सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्‍वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close