विशेष

पंढरपूर: नामसंकीर्तन साठी २० कोटी आणखी २५ कोटी ₹ प्रतीक्षा

पंढरपूर- निधी अभावी ठप्प असलेल्या येथील भव्य नामसंकीर्तन सभागृहाच्या कामासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २० कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. यासाठी परिचारक यांनी पाठपुरावा केला होता.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. तसेच दैनंदिन विविध धार्मिक कार्यक‘म संपन्न होतात. भाविकांसाठी भव्य सभागृह तर स्थानिकांसाठी नाट्यगृह उभा करण्यात यावे अशी मागणी प्रशांत परिचारक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार २०१६ मध्ये यास मंजूरी मिळून पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी मिळाला. यामधून अतिशय सुंदर नामसंकिर्तन सभागृह उभारले आहे. मात्र भाजपाची सत्ता गेल्यानंतर मागील ३ वर्षापासून निधी अभावी सभागृहाचे काम बंद होते. यामुळे परिचारक यांनी, मु‘यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्याकडे उर्वरित कामासाठी ४५ कोटी रूपये इतका निधी मिळावा म्हणून मागणी केली होती.
काही दिवसांपूर्वीच पंढरीच्या दौर्‍यावर आलेल्या मुनगंटीवार यांनी सदर कामाची पाहणी केली व सभागृहाच्या बांधकामासाठी ३१ मार्चपुर्वी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे नामसंकिर्तन सभागृहाचे काम अत्यंत चांगले झाले असून निधीची मागणी केली. त्यानुसार मु‘यमंत्री यांनी तातडीने २० कोटी रूपये मंजूर केले असल्याचे परिचारक यांनी सांगितले.
दरम्यान अद्याप सदर काम पूर्ण करण्यास २५ कोटींची आवश्यकता असून यासाठी देखील पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close