विशेष

अभिमानास्पद :स्वेरीच्या सत्यम खांडेकर यांना अ‍ॅमेझॉनकडून 41.5 लाखाचे पॅकेज

पंढरपूर-  स्वेरी महाविद्यालयातील विद्यार्थी सत्यम खांडेकर यांची अ‍ॅमेझॉन कंपनीत निवड झाली असून त्यास  41.5 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती  प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.


सर्वोत्तम पॅकेज मिळविलेल्या सत्यम खांडेकर यांच्या सत्काराचे व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.  प्रारंभी सत्यम व त्यांच्या आई- वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीचे युवा विश्‍वस्त प्रा. सूरज रोंगे, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांनी सत्यम यांना अ‍ॅमेझॉनकडून मिळालेल्या नोकरीतील संधीच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली.  2021 सत्यम हनुमंत खांडेकर यांना स्वेरी अभियांत्रिकी मधून उत्तीर्ण झाल्यानंतर सुरूवातीला टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस व त्यानंतर आणखी मोठ्या पॅकेज असलेल्या सहा कंपन्याकडून नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या. एवढ्यावर न थांबता सत्यम यांनी आपले प्रयत्न अधिक जोमाने चालू ठेवले. आता त्यांना अ‍ॅमेझॉन कंपनीकडून वार्षिक 41.5 लाखाचे पॅकेज मिळाले आहे. ते कुर्डूवाडी येथील मध्यवर्गीय कुटुंबातील आहेत.
हे यश पाहता सत्यम यांना डॉ. बी.पी. रोंगे यांनी ‘स्वेरीचा आयकॉन’ अशा शब्दात संबोधले. संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्‍वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close