राज्य
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
उळे येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत
सोलापूर – ‘गण गण गणात बोते’ आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी (दि.2 जुलै) सायंकाळी उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत केले. यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, उळे गावचे सरपंच अप्पा धनके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, मंडळ अधिकारी चंद्रकांत हेडगिरे, सुखदेव पाटील, जगदीश धनुरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.
श्री शंभरकर यांनी गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखीचा आजचा मुक्काम उळे येथे असून उद्या सकाळी पालखी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे.