वरद व सृष्टी बडवे या विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनासाठी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
पंढरपूर – नवी दिल्लीत झालेल्या पर्यावरण संवर्धन उपक्रमात पंढरपूरच्या सिंहगड पब्लिक स्कूलमधील वरद बडवे व सृष्टी बडवे यांनी बिया संकलन व वृक्षारोपण पुनर्वसनाचे सादरीकरण केले होते. यासाठी त्यांचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दिल्ली येथे संपन्न झालेल्या ग्रीन आर्मी या कार्यक्रमात देशातील विविध ठिकाणच्या 13 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थीनी पर्यावरण संवर्धनासाठी तयार केलेल्या उपक्रमाचे सादरीकरण केले. वरद बडवे व सृष्टी बडवे यांनी बिया संकलन व वृक्षारोपण पुनर्वसन या उपक्रमाचे सादरीकरण केले होते. यावेळी लोकसभेचे सभापती ओम बिरला तसेच केंद्रीयमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले . याबद्दल शाळेच्या प्राचार्या स्मिता नवले व मुख्याध्यापिका स्मिता नायर यांनी वरद आणि सृष्टी बडवे यांचे अभिनंदन केले आहे.