प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-२ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया आता दिवाळीनंतर २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होणार
पंढरपूरः ‘शै. वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशाची दुसरी फेरी (सेकंड कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि. २७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया शनिवार, दि.२९ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी अभियांत्रिकीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. या दुसऱ्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दि. ३१ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे.ज्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही व ज्यांनी प्रथम फेरीत नॉट फ्रीझ/ बेटरमेन्ट केली आहे त्यांना या दुसऱ्या फेरीचा लाभ घेता येईल.’ अशी माहीती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
सन २०२२-२३ च्या पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रियानंतर पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीत योग्य महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच मिळाली नसेल अथवा कुठेच प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी आता दुसरी फेरी असून योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याबाबत चे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड- २ चे ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) दि ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केले जाणार आहे. दुसऱ्या फेरीनंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन मंगळवार दि.१ नोव्हेंबर ते गुरुवार दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागेल. प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या दुसऱ्या फेरीला देखील विक्रमी गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.