वाडीकुरोलीची खो-खो खेळाडू प्रीती काळेला राष्ट्रीय जानकी पुरस्कार, सोलापूर जिल्हाला मिळाला प्रथमच मान
पंढरपूर – वाडीकुरोली ( ता. पंढरपूर) येथील वसंतराव काळे प्रशालेची राष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू प्रीती काळे हिला राष्ट्रीय खो- खो स्पर्धेत कुमारी गटातील सर्वोच्च अष्टपैलू खेळाडूचा जानकी पुरस्कार मिळाला आहे.
अशी कामगिरी करणारी प्रीती सोलापूर जिल्ह्यतील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.पश्चिम बंगाल येथील बन्सबेरीया जिल्हा हुबळी येथे शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला पुरस्कार मिळाला . 41 व्या राष्ट्रीय खो -खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने ओडिसा संघाचा अंतिम सामन्यात 16- 10 असा सहा गुणांनी धुवा उडवत रुबाबात अजिंक्यपद मिळवले. सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघाकडून खेळताना प्रीती काळेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला जानकी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रा संघातून खेळताना अंतिम सामन्यात तिने पहिला डावात 3.00 मी. संरक्षण व 2 गुण व दुसऱ्या डावात 2.20 संरक्षण व 2 गुण मिळवून महाराष्ट्र संघाला सुवर्ण यश मिळवून दिले. भारतीय खो-खो महासंघाचे सहसरचिटणीस चंद्रजीत जाधव महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा सचिव संदीप तावडे सहसचिव डॉ. प्रशांत इनामदार महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड सहायक प्रशिक्षक राजेश कळबटे व्यवस्थापिका अमिता गायकवाड फिजीओ अमित राहवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रीती काळे ही वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोलीची विद्यार्थिनी असून कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर नियमित क्रीडा प्रशिक्षक संतोष पाटील, अतुल जाधव, समाधान काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आतापर्यंत खेलो इंडियासह नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना प्रीतीने सुवर्ण कामगिरी केली आहे. तिच्या यशाबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सचिव बाळासाहेब काळे, सोलापूर अमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, सचिव सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, महाराष्ट्र पंच मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत ढेपे ,सदस्य शरद व्हनखडे, के के स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष समाधान ,काळे प्राचार्य दादासाहेब खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे यांनी अभिनंदन केले.
राष्ट्रीय खो खो स्पर्धेत आतापर्यंत 9 वेळा महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्ण कामगिरी केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्र संघातून खेळताना खो-खोतील देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार मिळवणारी प्रीती काळे सोलापूर जिल्ह्यातील पहिली खेळाडू आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व खो खो प्रेमीच्या कडून कौतुक होत आहे