Uncategorizedराजकिय
तीन महिन्याच्या ब्रेकनंतर भीमा कारखान्याची निवडणूक रणधुमाळी पुन्हा सुरु
पंढरपूर – राज्यात अतिवृष्टीची स्थिती पाहता जुलै महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता याची प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. मोहोळ व पंढरपूर तालुक्यात गाजणाऱ्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ज्या टप्प्यात थांबली होती. तेथूनच पुन्हा सुरु होत आहे. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. तर १३ नोव्हेंबर लाख मतदान व १४ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत सुरु असताना निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. पंधरा जागांसाठी रणधुमाळी होत आहे. या निवडणुकीत प्रशांत परिचारक गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यमान अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.