..यासाठी प्रशांत परिचारक अर्बन बॅंकेच्या संचालक मंडळात गेले नाहीत…अर्ज काढला
काही वेळा थांबणे ही गरज बनते ..! सहकारी मित्र ,पंढरपूर अर्बन बँकेचे सर्व ग्राहक , सभासद , हितचिंतक सर्वांचे आभार 🙏 सन 2002 साली मोठ्या मालकांचे आशीर्वादाने ज्या सेवेची संधी मिळाली ती सेवा गेली 20 वर्षे इमाने इतबारे केल्यानंतर आज नवीन युवकांना संधी देऊन संस्था भविष्यात वाढली पाहिजे टिकली पाहिजे आणि यासाठी नवीन पिढी तयार झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आज मी बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त होत आहे. थांबलो असलो तरी येणाऱ्या काळात ही बँक आपली आहे या नात्याने एक मार्गदर्शकाच्या भूमिकेतून अविरत पणे सेवा करत राहिन.! माझ्या राजकीय जीवनाचा संस्थेवर परिणाम होऊ नये हा व्यापक विचार करून मी हा निर्णय घेत आहे ..!पंढरपूर अर्बन बँकेच्या सर्व नूतन संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा देतो..! आपलाच
प्रशांत परिचारक
पंढरपूर – पंढरपूर अर्बन को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले विद्यमान अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपलाच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हाच जिल्हाभर चर्चेचा विषय बनला. २९०० कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या बॅंकेचा कारभार त्यांनी २० वर्षे सांभाळला आहे. अचानक त्यांनी अर्ज मागे घेत तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची त्यांची प्रतिक्रिया वर प्रसिद्ध केली आहे. माझ्या राजकीय जीवनाचा संस्थेवर परिणाम होऊ नये हा व्यापक विचार करून मी हा निर्णय घेत आहे असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून कळविले आहे. मागील अनेक दशकं परिचारक यांचे बॅंकेवर वर्चस्व आहे. आता राजाराम परिचारक हे संचालक मंडळात गेले आहेत. तेच अध्यक्ष होतील , अशी चर्चा आहे.