उजनी व नीरा खोर्यातील धरणात गतवर्षीपेक्षा किती कमी पाणीसाठा?
https://youtu.be/nczmQdoRXLQ?si=oXaAjLL634aEqyFK
उजनी ,नीरा खोरे VDO news 👆
पंढरपूर- यंदा कमी पाऊस झाल्याने राज्यातील धरणांमध्ये कमी जलसाठा होवू शकला आहे. सर्वात मोठे धरण व सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनीत तर यंदा गतवर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला (18 डिसेंबर) जवळपास 80 टक्के कमी पाणी आहे. नीरा खोर्यातील प्रकल्पांमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा आहे.
वीर धरणात सध्या 60.32 टक्के जलसाठा असून गतवर्षी ता 59.33 टक्के होता. तर देवघर धरणात 78 टक्के पाणी सध्या शिल्लक आहे जे गतवर्षी 100 टक्के होते. भाटघर धरणात सध्या 76.28 टक्के पाणी आहे जे मागील वर्षी याच तारखेला 97.99 टक्के इतके धरण भरलेले होते. गुंजवणी प्रकल्पात 95.81 टक्के पाणी असून मागील वर्षीच्या तुलनेत पाणी कमी आहे. 2022 ला याच तारखेला गुंजवणीत 96.98 टक्के जलसाठा होता.
उजनी धरण हे नीचांकी भरले असून पावसाळा हंगाम संपताना यात 66 टक्के पाणी होते मात्र भीमा नदी व कॅनॉलमध्ये पाणी सोडल्याने सध्या हा प्रकल्प 21.46 टक्के अशा स्थितीत आहे. धरणात एकूण पाणीसाठा 75.16 टीएमसी इतका आहे तर उपयुक्त पातळी हे 11.50 टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. सध्या धरणातून सीना माढा , दहिगाव योजना , भीमा-सीना जोडकालवा व मुख्य कालव्यात पाणी सोडले जात आहे.
पुणे विभागातील काही धरणांमधील आजच्या तारखेचा जलसाठा – चासकमान 92.40 टक्के, घोड 92.55, पवना 71.66, खडकवासला 74, मुळशी 85 तर भामा आसखेडा 85 टक्के.