राजकिय

आ. बबनदादांची खा. निंबाळकरांना माढा – करमाळ्यातून दोन लाखाच्या मताधिक्याची ग्वाही , श्रीपुरात मोहिते पाटलांविना कार्यक्रम

पंढरपूर – आज श्रीपूर ( ता.माळशिरस) येथे श्रीपूर ते खंडाळी रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत 7 कि.मी. डांबरीकरण झालेल्या या रस्त्याचा एकूण खर्च 510.39 लक्ष झाला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघात आता नवीन समीकरणं तयार होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातून २०२४ ला दोन लाख मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.

हा कार्यक्रम मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात असणाऱ्या श्रीपूर येथे पार पडला, ज्यास कोणीही मोहिते पाटील उपस्थित नव्हते. मोहिते पाटील यांचे खासदार निंबाळकर तसेच आमदार शिंदे बंधू यांच्याशी पटत नाही हे पुन्हा पाहावयास मिळाले.
या लोकार्पण समारंभा प्रसंगी आ. बबनदादा शिंदे म्हणाले , या खासदारांनी चार वर्षात आम्हाला कोणताही त्रास दिला नाही , उलट झालीतर मदतच झाली असल्यामुळे व विकास कामांबाबत कायम सहकार्याचे धोरण असल्यामुळे अशा खासदारांना मागील मताधिक्यापेक्षा अधिक म्हणजेच माढा – करमाळा या दोन तालुक्यातून दोन लाखाचे लीड देऊ. मागील निवडणुकीत निंबाळकर यांनी आ. बबनदादा यांचे बंधू आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव केला होता. मात्र आता बदलती राजकीय समीकरणं पाहता व निंबाळकर यांचे अकलूजच्या मोहिते पाटील यांच्याशी पटत नसल्याने शिंदे व निंबाळकर राजकीयदृष्ट्या गेल्या दिवसांपासून जवळ आहे आहेत, तर आता राज्यात ही अजितदादांची राष्ट्रवादी भाजप बरोबर आहे.

या कार्यक्रमात आ.शिंदे यांनी आपण व निंबाळकर यांनी माढा विधानसभेला जोडलेल्या माळशिरस तालुक्यातील १४ गावात केलेल्या विकासकामांची यादी निवेदित केली. केंद्र असो किंवा राज्य असो यमाई मंदिर जीर्णोद्धारा्स एक रुपया ही कमी पडून देणार नाही, असा शब्द दिला . यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उदघाटक रणजितसिंह नाईक निंबाळकर, रणजितभैय्या शिंदे, उत्तमराव जानकर, राजकुमार पाटील, माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, नगराध्यक्ष चव्हाण, अशोकराव चव्हाण, तसेच म्हाळुंग नगर पंचायती चे नगरसेवक व पंचक्रोशितील नागरिक उपस्थित होते.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close