प्रा. सुभाष माने यांनी तेरा गावांसाठी भरघोस निधी खेचून आणला, परिचारकांकडून कौतुक
पंढरपूर, दि. – जिल्हा परिषद सुभाष माने यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षाची भूमिका बजावत रोपळे गटातील तेरा गावांसाठी भरघोस निधी खेचून आणला,असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
ईश्वर वठार (ता.पंढरपूर) येथे प्राचार्य सुभाष माने यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्ताने भव्य नागरी सत्कार व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व पांडुरंग साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनदादा शिंदे होते. पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, दिनकर मोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, महात्मा गांधींनी ग्रामविकासाची जी संकल्पाना केली होती. ती संकल्पना ईश्वर वठार मध्ये माने बंधूंनी राबवली व आपल्या गावाचा विकास केला. कै.सुधाकरपंत परिचारक यांनी परिवारातील लोकांवर जे संस्कार केले. या संस्कारातून माने बंधूंनी अनेक मुलांना घडवले व त्यांचे संसार उभे केले. निवणडणूकीला उभे राहिले की आपण कामे केली पाहिजेत ही कै.सुधाकरपंत परिचारक यांची भूमिका होती. या भूमिकेतून प्राचार्य सुभाष माने यांनी काम केले.
सत्कारमूर्ती जिल्हा परिषद सुभाष माने म्हणाले की , कै.सुधाकरपंच परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्तवानुसार जिल्हा परिषदेमध्ये काम केले. काम करत असताना रोपळे गटातील 13 गावांच्या विकास कामांसाठी 11 कोटी रुपयांचा निधी आणला. या कामासाठी आमदार बननदादा शिंदे व प्रशांत परिचारक यांचे सहकार्य मिळाले. नेता सक्षम असेल तर काम करण्यास वाव मिळतो. आमदार बबनदादा शिंदे, प्रशांत परिचारक आणि मी स्वतः ईश्वर वठार गावासाठी 9 कोटी
रुपयांची विकास कामे केली आहेत. शिवाय कोणत्याही गावात दुजाभाव न करता, सर्व गावांना भरघोस निधी दिला आहे. आता पर्यत रोपळे गटातील विविध संस्थांच्या पदाधिकारी, सरपंच आणि नागरिकांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आमदार बबन दादा शिंदे म्हणाले, गत पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रोपळे गटाचा विकास करण्यासाठी सुभाष माने यांनी उत्तम काम केले आहे. हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांना ईश्वर वठार हे गाव दाखवण्यासाठी मी स्वतः घेवून येणार आहे. यावेळी माजी पंचायत समिती सभापती वामनराव माने म्हणाले , शिंदे व परिचारकांनी आमच्या माने बंधूवर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही. गावातील लोकांनी जे प्रेम दिले ते आमच्यासाठी खूप मोठे आहे. यावेळी सरपंच सितादेवी माने,डॉ. प्रतापसिंह माने, उपसरपंच विजयसिंह माने, विक्रमसिंह माने, अजयसिंह माने, औदुंबर मेटकरी, संजय देशमुख, प्राचार्य उत्तम कोकरे, मधुकर चौगुले, आप्पा खांडेकर, संपतराव देशमुख, हणमंत देशमुख, धोंडीबा गलांडे यांच्याासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.