सोमवारपासून जिल्हा ग्रामीणमध्ये अनलॉकचे नियम जैसे थे, कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5.10 टक्के असल्याने ग्रामीण भाग तिसर्या टप्प्यातच
सोलापूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणचा ( सोलापूर महापालिका वगळून) कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा 5.10 टक्के असून ऑक्सिजन बेडची ( bed accupancy rate ) टक्केवारी वीस असल्याने ग्रामीण भाग हा तिसर्या टप्प्यात मोडत असून येथील अनलॉकची स्थिती ही जैसे थे राहणार आहे. म्हणजेच सोमवार {14 जून } ते शुक्रवार सर्व दुकाने ही दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवांच्या अस्थापना वगळता सर्व बंद असणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनलॉकसाठी टप्पे ठरवून दिले असून यात पाच स्तर करण्यात आले आहेत. 7 जून रोजी सोलापूर शहरासह जिल्हा तिसर्या स्तरात असल्याने येथे सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सर्व दुकानांना परवानगी होती. तर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्य सेवांची दुकाने उघडण्यास मान्यता होती.
प्रत्येक आठवड्याला याचा आढावा घेतला जात असून आता उद्या 14 जून पासून सोलापूर शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा 2 टक्के असल्याने तो दुसर्या टप्प्यात आला असल्याने तेथील निर्बंध आता कमी करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय,प्रार्थनास्थळ सोडून अन्य व्यवहार पूर्वपदावर आणण्यात आल्याचे महापालिकांनी आयुक्तांनी कळविले आहे.
7 जून चा आदेश