पुणे विभागातील धरणनिहाय आजचा शिल्लक पाणीसाठा किती? पाहा
पंढरपूर – यंदा कमी पावसामुळे पुणे विभागातील धरणांमध्ये 80.46 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून जो गतवर्षीच्या तुलनेत 15 टक्के कमी आहे. उजनी व कोयना सारखी धरण भरू न शकल्याने पाणी टक्केवारी कमी दिसत आहे. पुणे विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा , पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
पुणे विभागातील धरणांमधील जलसाठा टक्केवारी पुढील प्रमाणे – राधानगरी 93.26 टक्के, तिलारी धामणे 96.34, तुळशी 83.98, दूधगंगा 86.95, निरा देवघर 97.04, डिंभे 95.83, भामा आसखेड 87.72, येडगाव 94.54, चासकमान 95.68, पिंपळगाव जोगे 80.15, वडज 97.49, माणिकडोह 78.14, घोड चिंचणी 100, पवना 79.45, भाटघर 96.42, खडकवासला 70.45, पानशेत 97.15, वरसगाव 93.31, गुंजवणी 96.99, टेमघर 65.46, मुळशी टाटा 92.37, लोणावळा 7.85, वाळवण 84.72 , शिरावटा 89.92, ठोकरवाडी 99.15, कुंडली 70.50.
वारणा 92.70, धोम बलकवडी 66.33, तारळी 89.23, धोम 76.74, कोयना 80.33, कण्हेर 71.53, उरमोडी 59.19, वीर 55.82 , उजनी 44.40 टक्के.