राज्य

उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार, राज्यात सध्याच वीस टक्के कमी पाणीसाठा

पंढरपूर – यंदाच्या वर्षी पावसाच्या लहरीपणाचा  फटका राज्याला बसताना दिसत असून हिवाळा हंगाम सध्या सुरू असून गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील सहाही विभागात मिळून वीस टक्के कमी पाणीसाठा आहे. सर्वात कमी पाणी हे मराठवाडा विभागात शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
राज्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लहान अशा 2 हजार 294 प्रकल्पांमध्ये मिळून 69.79 टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी  2022 मध्ये या तारखेला  सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 90.16 टक्के इतका होता. सर्वात कमी पाणी यंदा मराठवाड्यात शिल्लक आहे ते 37.04 टक्के इतकेच आहे. मराठवाड्यातील 44  धरणांमध्ये केवळ 42.91 टक्के जलसाठा आहे. पुणे विभागात सर्व प्रकल्पांमध्ये मिळून 75.64, कोकणात 86.91, नागपूर 73.01, अमरावती 79.31, नाशिक 75.61 टक्के जलसाठा आहे.
 2023 च्या पावसाळा हंगामात पावसाने ओढ दिली व नंतर जरी त्याचे पुनरागम झाल्यानंतर ही जोर नसल्याने सरासरी इतका पाऊसही होवू शकला नाही. यामुळे धरणांमधील पाणी साठा कमी राहिला आहे. उजनीसारखे महाकाय धरण केवळ 60 टक्क्यांपर्यंत भरू शकले होते तर कोयना प्रकल्प ही क्षमतेने भरू शकला नाही. 

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close