विशेष

चिंताजनकच! जिल्हा ग्रामीणमध्ये 634 तर पंढरपूर तालुक्यात 167 कोरोना रूग्णांची नोंद


पंढरपूर –  शनिवार 21 ऑगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये एकूण 634 कोरोनाबाधित आढळून आले असून आजचा मृतांचा आकडा हा दहा इतका आहे. सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात असून संचारबंदी असणार्‍या पंढरपूर, माळशिरस व करमाळा या तालुक्यात आजची रूग्णसंख्या ही शंभरीपार आहे ही चिंताजनक बाब म्हणावी लागणार आहे.
पंढरपूर तालुक्यात 167, माळशिरस 122, करमाळा 124, सांगोला 53 तर माढा तालुक्यात 75 रूग्णांची आज नोंद आहे. या तालुक्यांमध्ये मागील आठ दिवसांपासून म्हणजेच 13 ऑगस्ट पासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र याचा काही फायदा होताना दिसत नाही. येथील रूग्ण संख्या वाढतच आहे. आजच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 2, माळशिरस 2, माढा 2 अशी मृत्यूची नोंद आहे. पंढरपूर तालुका हा रूग्णसंख्येत अव्वल असून एकूण रूग्णसंख्या 31 हजार 12 इतकी झाली असून आजवर या तालुक्यात एकूण मृत्यूंची नोंद 568 आहे. सध्या येथील 845 जण उपचार घेत असून 29 हजार 599 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या अहवालानुसार पंढरपूर शहरात 16 तर तालुक्यात 151 रूग्ण आढळून आले आहेत. 

Header

Related Articles

Back to top button
Close
Close