राज्य

उजनीतून भीमा नदीत 10 हजार क्युसेकने पाणी सोडले

पंढरपूर – उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये दहा हजार क्युसेकने पाणी सोडण्याची प्रक्रिया मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. वीज निर्मितीसह नदी पात्रात 11 हजार 600 क्युसेक ने पाणी सोडले जात आहे.
सायंकाळी उजनी मध्ये येणारी पाण्याची आवक वाढवून 20 हजार 849 क्युसेक इतकी झाली होती. मुळशी, पवना, कासारसाई व खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा 20 हजार क्युसेक इतका झाला आहे. दरम्यान मागील 24 तासात भीमा खोऱ्यात अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे.
नीरा नदीवरील वीर धरणातून 8 हजार क्युसेक पाणी सकाळी आठ वाजल्यापासून सोडले जात आहे. उजनी व वीर मधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळी ही आता वाढणार आहे.
उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा 111. 42 टीएमसी असून यातील उपयुक्त पाणी हे 47.77 टीएमसी इतके आहे.धरण 89.16 टक्के भरलेले आहे. उजनीतून सध्या मुख्य कालव्यात 1900, भीमा सीना जोडकाव्यात 900, दहिगाव योजनेसाठी 80 ,सीना माढा योजनेसाठी 180 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close