अथक परिश्रमामुळे अवघ्या दोन महिन्यात साखर पूजन
आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीज प्रा. ली. नंदूर या साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामातील पहिल्या ११ साखर पोत्यांचे मार्गदर्शक आमदार समाधान आवताडे व कार्यकारी संचालक मोहन पिसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार आवताडे यांनी, आवताडे शुगर हा कारखाना ताब्यात आल्यापासून कारखाना हा प्रत्येक विभागीतील अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसरात्र काम करून दोन महिन्यात हा कारखाना गाळपास तयार केला व त्यास सक्षम अशी शेतकी विभागाने ही कमी कालावधीत वाहतूक यंत्रिणा उभी केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य मोळीपूजनाचा कार्यक्रम घेऊ शकलो. आज तयार झालेली ११ पोती हे कामगार व कारखाना प्रशासनाच्या अथक परिश्रमाचे फळ असल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले. तसेेच आवताडे शुगर हा कारखाना शेतकरी हितासाठीच काम करणार असून या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्यात येईल त्याचबरोबर उसाच्या वजनामध्ये कोणतीही तफावत दिसून येणार नाही. यावेळी साखर पूजन कार्यक्रमावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, भाजपाचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, दामाजीचे माजी मिस्टर संचालक भारत निकम, जगन्नाथ रेवे, ब्रह्मदेव रेवे, सचिन शिंदे, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर दिलीप जाधव, चीफ केमिस्ट मोहन पवार कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.