‘मॉक पार्लमेंट’ म्हणजे काय ? स्वेरी महाविद्यालयात नुकतेच याचे सत्र पार पडले..
पंढरपूर – एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या ‘ईलाइट’ मंचातर्फे विद्यार्थ्यांनी सादर केलेले एकदिवसीय ‘मॉक पार्लमेंट’ सत्र नुकतेच संपन्न झाले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
स्वेरी अभियांत्रिकी मध्ये हा उपक्रम विविध उद्देशांनी आयोजित केला जातो जसे कि, विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धती समजून घ्यावी, संसदेच्या कामकाजाचे ज्ञान प्राप्त करावे, सार्वजनिक समस्यांवर विचारमंथन करून त्यावर आपले मत मांडावे, विद्यार्थ्यांमध्ये इतरांच्या विचारांबद्दल आदर आणि सहिष्णुता निर्माण व्हावी, कोणतीही चर्चा पद्धतशीरपणे आणि प्रभावीपणे आयोजित करण्यासाठी संविधानातील नियमांचा आदर करणे, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे हे या उपक्रमाचे मुख्य हेतू आहेत. मॉक पार्लमेंट मध्ये भूमिका साकारताना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भूमिका उत्तमपणे साकारल्या. जसे कि, संसदीय स्पीकर- साक्षी रनवरे, सहाय्यक सचिव यांची भूमिका स्वप्नाली पवार व कांचन व्यवहारे यांनी साकारली. सत्ताधारी पक्षातून भूमिका साकारणारे विद्यार्थी याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत दीपक पाटील, गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेत रितेश चव्हाण, स्मृती इराणी- शिवभक्ति देशमुख, वित्त मंत्री- स्वराली जोशी, कृषी मंत्री-सुयश गायकवाड, कायदा व न्याय मंत्री किरण रिजीजू-आदित्य सरडे, आरपीआय चे नेते रामदास आठवले यांच्या भूमिकेत ऋतुराज तारापूरकर, विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या भूमिकेत शिवराज मगर, समंथा अंबरीश-दिशा भट्टड, गुलाब कोर-प्रांजली उत्पात, विनया राऊत यांच्या भूमिकेत कॅन्नी संतांणी, प्रज्वल रेवांना-धनराज इंगळे, माधवी-वृषाली जानगवळी यांनी भूमिका साकारल्या. या मॉक पार्लमेंट सत्रामध्ये जवळपास ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी खासदारांच्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. श्रोते म्हणून द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.मोहम्मद मुशेब हे होते. सूत्रसंचालन वैष्णवी मुचलंबे आणि प्रांजली उत्पात यांनी केले तर रोहीत मिसाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.