राजकिय

“मनसे” चे लक्ष सहकार क्षेत्रावर , पदाधिकाऱ्यांसाठी भरविले प्रशिक्षण शिबिर

पंढरपूर – राज्यात सहकारक्षेत्र विस्तारले असून ग्रामीण भागाचा तर तो कणा मानला जातो , हे पाहता आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार सेनेच्यावतीने २५ व २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी सहकार निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती सहकार सेनेचे अध्यक्ष तथा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी दिली.

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते होणार ज्यावेळी नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत हे नेते उपस्थित असणार आहेत. या शिबिरात विविध विषयांवर तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. २५ रोजी सेवा सहकारी संस्था नोंदणी, व्यवस्थापन व कार्यप्रणाली या विषयावर दिनेश नाईक हे माहिती देणार आहेत. गृहनिर्माण संस्था या विषयावर दिवाकर कोयंडे हे मार्गदर्शन करतील. याच दिवशी प्रबोधिनी भेट, ग्रंथालय पाहणी व नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

२६ रोजी अनिल शिदोरे, आमदार राजू पाटील, जयप्रकाश बाविस्कर, अभिजित पानसे , संजय चित्रे, राजेंद्र बागस्कर, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता यांच्या उपस्थितीत शिबिरास सुरूवात होणार आहे. या दिवशी डॉ. शशीताई अहिरे या कृषी विषयक सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करतील. तर सहकारी वित्तीय संस्था या विषयावर करसल्लागार उदय कर्वे विचार व्यक्त करतील. तर विजय जोशी हे महिला सेवा संस्था व बचत गट विषयाची माहिती देणार आहेत. या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, भाषण व वक्तृत्व या विषयावर रवींद्र साठे मार्गदर्शन करणार आहेत. तर अध्यक्षीय भाषणाने शिबिराचा समारोप होईल, असे धोत्रे यांनी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close