उध्दव ठाकरे यांनी केले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे कौतुक
मुंबई – माढा लोकसभेतच नव्हे तर राज्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने उत्साह संचारला होता. मोहिते पाटील यांचे बंड महाविकास आघाडीला ऊर्जा देवून गेले आणि याच बळावर राज्यात आपणाला मोठे यश मिळाले, असे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले .
शुक्रवारी मुंबई येथे मातोश्री या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा सत्कार ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ , सोलापूर जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे, युवा जिल्हाप्रमुख गणेश इंगळे तालुका प्रमुख संतोष राऊत, अरविंद पाटील, बंडू घोडके, शहरप्रमुख कमृद्दिन खतीब, तुषार इंगळे, महादेव बंडगर उपस्थित होते.
खा . धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले , माढा लोकसभा निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून काम केले म्हणूनच मोठे मताधिक्य मिळाले. माझी खासदारकी ही माढा लोकसभेतील प्रत्येक मतदारांच्या अपेक्षापूर्तीसाठी असेल. या मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, उद्योग, शिक्षण व मुलभूत सुविधांसाठी समर्पित असेल.