कासेगाव व पंढरपूर मंडलात सर्वाधिक मान्सूनपूर्व पावसाची नोंद
पंढरपूर – रविवार 26 मे रोजी सायंकाळी पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये सरासरी 18.77 मिलिमीटर इतके मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस कासेगाव मंडलामध्ये 39 तर पंढरपूर शहरात 38 मिलिमीटर झाला आहे.
रविवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसात व वादळीवाऱ्यामध्ये पंढरपूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान ही नोंदले गेले आहे. मागील चार दिवस मोठा उन्हाळा या तालुक्याने सहन केला. यानंतर रविवारी वादळी वाऱ्यासह पाऊस नोंदला गेला आहे करकंब मंडलामध्ये 23 पटवर्धन कुरोली, सात, भंडीशेगाव बारा, कासेगाव 39, पंढरपूर 38, तुंगत 22, चळे 17 तर पुळूज मंडलामध्ये 21 मिलिमीटर अशा एकूण 169 तर सरासरी 18.77 मिलिमीटर पावसाची नोंद पंढरपूर तालुक्यात झाली आहे.
वादळी वारे व पाऊस यामुळे अनेक ठिकाणी विजेचे टॉवर कोसळले आहेत. तर अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली आहेत. वीज पडून एका महिलेचा मृत्यूही रविवारी झाला. दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारे उजनी परिसरामध्ये काल केवळ एक मिलिमीटर पावसाची नोंद आहे. तर मान्सूनपूर्व पावसाने माढा भागामध्ये हजेरी लावली. तेथे 27 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. याचबरोबर सांगोला ,सिद्धेवाडी येथेही पावसाची नोंद आहे.