मध्यप्रदेशातील तीर्थक्षेत्र उज्जैनमध्ये कॅरिडाॅर राबवून विकास करण्यात आला असून हे शहर आता भव्य दिव्य दिसत आहे. उज्जैन हे क्षिप्रा नदीच्या काठी वसले असून ते प्राचीन आहे. येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग व काल भैरव मंदिर प्रसिद्ध आहे. येथे बारा वर्षातून एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरतो. अशाच धर्तीवर महाराष्ट्रातही वारकरी संप्रदायाचे आराध्य स्थान पंढरपूर मध्ये विकास आराखडा व कॅरिडाॅर राबविण्याचा राज्य व केंद्र सरकारचा विचार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु आहे. यास स्थानिकांचा विरोध वाढत आहे. उज्जैनमध्ये कॅरिडाॅर राबविण्यासाठी स्थानिकांचे पुनर्वसन कसे झाले आहे.. हे स्थानिकांनी तेथे जावून पाहिल्यास अनेक प्रश्न सुटतील. उज्जैन ची भरभराट सध्या सुरू असून भाविक पर्यटकांची मोठी गर्दी तेथे रोजच आहे. व्यवसाय तेजीत आहेत.