राज्य

नियंत्रण मंडळातच लाचखोरीचे “प्रदूषण”, साखर कारखान्याकडून लाच घेताना मोठा अधिकारी जाळ्यात

सोलापूर – साखर कारखान्याकडून 2 लाखाची लाच घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्याला येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर नियंत्रण मंडळातच लाचखोरीचे प्रदूषण असल्याचे दिसत आहे. सोलापुरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नुतनीकरण करण्यास मदत केल्याचा मोबदला तसेच कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असल्याबाबत लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरीता 2 लाखाची लाच घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अजित वसंतराव पाटील ( वय ५० वर्षे पद- उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालय सोलापूर )असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.यातील प्राप्त तक्रारीनुसार उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय सोलापूर यांनी तक्रारदार यांना साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नुतनीकरण करण्यास मदत केल्याबाबतचा मोबदला तसेच कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असलेबाबत लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरीता व प्रस्तावित फार्मासिटीकल्स युनिटचे कंसेन्स्ट्स टू इस्टॅब्लिश या लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्वतः स्वीकारुन त्यांनी वैयक्तिक सांपत्तीक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले आहे. यातील आलोसे यांना लाचेची मागणी करुन स्वतः लाचेची रक्कम स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आहे.

ही सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, किणगी यांनी केली.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close