विशेष

पंढरपूर -मंगळवेढा- विजापूर रेल्वेमार्गाबाबत केंद्र सरकार सकारात्मक ; आ. आवताडे यांच्या मागणीला यश, रेल्वे विभागाकडून पत्र प्राप्त


पंढरपूर – मंगळवेढा मार्गे पंढरपूर – विजापूर रेल्वेमार्गाच्या मागणीस केंद्रीय रेल्वेमंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पुढील कार्यवाहीसाठी संबधित विभागास याबाबतचे आदेश देण्यात आले असून याबाबतची माहिती देणारे  पत्र आमदार समाधान आवताडे यांना प्राप्त झाले. त्यामुळे हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविला जाण्याच्या या भागातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये अनेक वारकरी, भाविक वर्षभर येत असतात. यात  कर्नाटक राज्यातून  मंगळवेढामार्गे पंढरपूरला येणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. 2013 मध्ये रेल्वे अर्थिक अंदाजपत्रकात पंढरपूर – मंगळवेढा – विजापूर या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणास मंजुरी दिली होती. 2018 मध्ये रेल्वेमार्गाचा सर्व्हे होऊन त्याचे अंदाजपत्रक केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. या सर्व्हेनुसार हे काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु हा प्रकल्प स्थगित ठेवणेबाबतचे पत्र 6 ऑगस्ट 2018 ला मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला मिळाले.
आमदार समाधान आवताडे यांनी 25 जुलै 2021 ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट घेवून जिल्ह्यातील सांगोला – मंगळवेढा – सोलापूर व पंढरपूर – विजापूर या मार्गांना जोडणारी रेल्वे सुविधा मंजूर व्हावी मागणी केली. तसेच प्रकल्प सुरु होण्याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करून त्यासाठी लागणारा अर्थिक निधी उपलब्ध व्हावा असा आग्रह केला होता. यापैकी पंढरपूर- मंगळवेढा- विजापूर रेल्वे प्रकल्प कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणारा असल्याने व  यामुळे भाविक , शेतकरी यांना याचा फायदा होईल हे लक्षात घेवून या मार्गाबाबत रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याचे दिसत आहे. ही योजना मार्गी लागावी यासाठी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगीतले.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close