Great : स्वेरीने देशातील सर्वात जास्त ४ स्टार रेटिंग मानांकन दुसऱ्यांदा मिळविले
पंढरपूर-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत कार्यरत असणाऱ्या इनोव्हेशन सेल कडून देशातील सर्वात जास्त असणारे चार स्टार रेटींग दुसऱ्यांदा प्राप्त झाले आहे. असे मानांकन मिळविणारे स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
तंत्रशिक्षणात स्वेरी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या विकासाचा आलेख नेहमीच उंचावत असते. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत कार्यरत असणाऱ्या इनोव्हेशन सेल अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या स्वेरीज ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ या विभागाने स्वेरीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविले होते. त्यात इंडस्ट्री ४.०, स्टार्ट-अप, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट, डिझाईन थिंकिंग, क्रिटीकल थिंकिंग, पेटेंट फायलिंग यासारख्या आधुनिक विषयांची चर्चासत्रे व कार्यशाळा भरविण्यात आल्या होत्या. ‘या सर्व उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा तर होतोच शिवाय याचा विशेष फायदा त्यांना स्वतःचे उद्योग उभे करण्यासाठी होतो. तसेच जे विद्यार्थी आपले करिअर संशोधन क्षेत्रात करू इच्छितात त्यांनाही या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा लाभ होईल.’ अशी माहिती स्वेरीच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलच्या समन्वयक डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता व उद्योजकता या गुणांना उत्तेजन देण्यासाठी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यामुळे हे फोर स्टार रेटींग प्राप्त झाले असून यामध्ये विशेष कार्य केल्याबद्धल स्वेरीचे डॉ.प्रशांत पवार, डॉ.विद्याराणी क्षीरसागर, डॉ.रणजित गिड्डे, डॉ. प्रवीण ढवळे, डॉ. महेश मठपती, डॉ. धनंजय चौधरी, डॉ.दीप्ती तंबोळी, डॉ. श्रीकृष्ण भोसले, प्रा.दिग्विजय रोंगे, प्रा.अविनाश पारखे, डॉ. व्ही.ए.पाटील, प्रा. विनायक साळे, प्रा. स्मिता गावडे आदी प्राध्यापकांचा एआयसीटीई कडून ‘लेटर ऑफ अॅप्रीशिएशन’ देऊन सन्मान करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात संपूर्ण भारतातून २१८४ इतक्या स्वायत्त तत्वावर चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयांचा सहभाग होता. यापैकी महाराष्ट्रातून १५ महाविद्यालयांना ४ स्टार रेटींग मिळाले असून सोलापूर जिल्ह्यातील स्वेरी अभियांत्रिकी हे एकमेव महाविद्यालय आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे आणि शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली इनोव्हेशन सेलच्या स्वेरीच्या समन्वयक डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे यश मिळाले. यासाठी डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ. एन.बी. पासलकर, डॉ.पद्माकर केळकर, सुदर्शन नातू, अतुल मराठे, विवेक देशपांडे, बालमुकुंद हिरवे, रमेश आडवी, कमलेश पांडे, अशोक सराफ, अशोक रानडे व सुहास देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. इनोव्हेशन कौन्सिल तर्फे फोर स्टार रेटिंग मिळाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात स्वेरीची मान आणखी उंचावली आहे. स्वेरी महाविद्यालयाचा आय.आय.सी. कोड–आयसी २०१९१२२१२ असा असून भारतामध्ये जास्तीत जास्त स्टार रेटिंग मिळवलेल्या महाविद्यालयांपैकी स्वेरीचे हे एक महाविद्यालय आहे. या सर्व उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ प्लेसमेंट बरोबरच उद्योजकता विकासासाठी निश्चितच होणार आहे. फोर स्टार मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम. एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.