राजकिय

विजयदादांचे बेरजेचे राजकारण , कट्टर विरोधक बनले मित्र !


पंढरपूर- माळशिरस तालुक्याच्या राजकारणात अनेक वर्षे एकमेकांना शह-काटशह देणारे विजयसिंह मोहिते पाटील व भाजपाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील हे आता एकत्र आले असून अनेक वर्षाचा विरोध अखेर मावळला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही नेते एकाच व्यासपीठावर आले आणि एकमेकांची यापुढील काळात साथ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सुभाष पाटील व मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सार्‍या राज्याला माहित आहे. विधानसभेच्या तीन निवडणुका पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात लढविल्या होत्या. त्या लढती अत्यंत रोमहर्षक असायच्या. सुभाष पाटील हे धनगर समाजाचे नेते म्हणून प्रसिध्द आहेत. ते भाजपाशी निगडीत राहिले. 1990, 1995 व 1999 तीनवेळा त्यांनी मोहिते पाटील यांना जबर आव्हानं माळशिरस विधानसभा मतदारसंघात दिले होते. माळशिरस भागात त्यांचे वर्चस्व आहे.
आता मोहिते पाटील व सुभाष पाटील हे एकत्र आल्याने माळशिरसच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार हे निश्‍चित आहे.
दरम्यान कार्यक्रमात बोलताना अ‍ॅड. सुभाष पाटील म्हणाले, विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये असले असते तर महाविकास आघाडीच्या काळात त्यांना मोठे पद मिळाले असते. परंतु समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या लोक कल्याणाच्या धोरणामुळे मोहिते-पाटील यांनी सुज्ञ निर्णय घेऊन भाजपमध्ये आले. ते भाजपमध्ये आहे तोपर्यंत मी त्यांचा लक्ष्मण म्हणून काम करेन. लोकांना वाटत असेल सुभाष पाटील विजयदादांविरूद्ध लढले आणि आता दादांच्या हस्ते बोर्डचे उद्घाटन करतात. पण मी लढलो ते आमच्या समाजासाठी लढलो. परंतु विजयदादांनी सर्व समाजाला जाती घटकांना सोबत घेऊन तालुक्यात विकास केला. विजयदादांनी सर्वात मोठे काम काय केले असेल तर ते उजनीच्या कार्यक्षेत्रात तालुका नसताना तो समाविष्ट करून घेतला. दुष्काळी तालुक्यात विकासाला गती दिली. तसेच भाजपा व मोहिते-पाटील यांनी मला काही जबाबदारी दिली तर मी ती पार पाडेन असेही पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, के.के.पाटील, सोपान नारनवर बाळासाहेब सरगर, माळशिरसचे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख उपस्थित होते.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close