राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती जागा वाढणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई – राज्य सरकारने मध्यंतरी महापालिका व नगरपालिकेत लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता तर याच धर्तीवर आज सोमवार २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा ते सात टक्के जागा वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. महानगरपालिकाप्रमाणेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा ते सात टक्के जागा वाढू शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या इच्छुकांना अधिक जागा उपलब्ध होतील. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यात
विविध मुद्यांवर चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीत या जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हापरिषद, पंचायत समितीमधील समीकरणांमध्ये मोठा
बदल होणार