करमाळा – माढ्यात मोहिते पाटील यांच्याकडून पाहणी
पंढरपूर – करमाळा – माढा मतदारसंघातील कंदर, वडशिवणे, केम, ढवळस, चौभेपिंपरी, रोपळे, कव्हे, कुर्डुवाडी या गावांत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रांची पाहाणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली तसेच सरसकट पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या भागात सुमारे ५००० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. ऊस, केळी, उडीद, तुर,मका, कांदा आणि भाजीपाल्याची पिके वाहून गेली आहेत. काही ठिकाणी पाझर तलाव फुटल्यामुळे तलावाखालच्या विहिरी, कुपनलिका बुजून गेल्या आहेत. वीजपंप व इतर साहित्य वाहून गेले आहे. कुर्डुवाडी शहरात लोकवस्तीमधे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्याखाली जावून अनेक जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात त्या त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना करुन अतिवृष्टी बाधितांना न्याय देण्यासंदर्भात सूचित केले.
यावेळी करमाळा-माढा चे माजी आमदार नारायण पाटील, अनिरुध कांबळे,शिवाजीनाना कांबळे, सविताराजे भोसले, भारतनाना पाटील,अजित तळेकर, इतर नेतेमंडळी उपस्थित होती.