अमित ठाकरे यांचे दसऱ्यानंतर मराठवाडा दौऱ्याने सीमोल्लंघन
पंढरपूर – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे दसऱ्यानंतर 6 ऑक्टोबर पासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे बीड, संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेने ते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली होती.
राज्यातील सत्तांतरानंतर मनसे अध्यक्ष ही राज्याचा दौरा करत आहेत. विदर्भ, नाशिक, पुणे येथे त्यांचे दौरे झाले आहेत. उर्वरित महाराष्ट्रातही ते जाणार आहेत. आता त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे ही दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करत मराठवाडा दौरा करणार आहेत. मनसे राज्यात आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पक्ष नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे हे कामाला लागले आहेत.
बीड येथील बैठकीस मनसेचे राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, सतनामसिंग गुलाटी, विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस राजू जावळेकर, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे, बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, रुपेश सोनटक्के, जालना जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, रवी राऊत, प्रकाश बापू सोळंके, संभाजीनगर महानगरप्रमुख बीपीन नाईक, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संकेत शेटे, राहुल पाटील, शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी मुंडे, जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर,जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे, जिल्हा सचिव अशोक सुरवसे उपस्थित होते.